Lampan: प्रकाश नारायण संत यांच्या कादंबरीवर सीरिज; ‘लंपन’ची गोष्ट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर

lampan sonyliv In Marathi

मे महिन्याची सुट्टी लागली आहे. या सुट्टीत काय करावे हा प्रश्न बच्चेकंपनीसमोर नसला तरी त्यांच्या पालकांसमोर नक्कीच असणार. मुलांनी चांगले वाचावे, ऐकावे, भरपूर खेळ खेळावे असा त्यांचा प्रयत्न असणार आहे. पण मोबाईल गेमच्या चक्रातून या मुलांना बाहेर काढण्याचे कामही मोठे कसबीचे आहे. या सर्वांवर एक उत्तर आहे, ते म्हणजे, लंपन. आता हे लंपन म्हणजे काय असे विचाराल तर तो प्रकाश नारायण संत यांचा मानसपुत्र आहे. साहित्यिक प्रकाश संत यांनी या लंपनवर अनेक कथा लिहिल्या आहेत. कोकणातल्या लाल मातीवर घडलेल्या या कथा प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतील अशाच आहेत. या कथांवर आधीरित लंपन अशी वेबमालिकाच आता १६ मे रोजी सोनी टिव्हीवर येत आहे. (Lampan Sony Liv)

लंपन वेबसिरीज निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक म्हणून निपुण धर्माधिकारी यांची ओळख आहे. मी वसंतराव, धप्पा, बापजन्म या चित्रपटामधून निपुण धर्माधिकारी यांनी ओळख मिळवली आहे. राष्ट्रीय पुरस्कार ते ऑस्कर मध्ये धडक अशा या व्यक्तिमत्वानं जेव्हा लंपन हातात घेतली, तेव्हाच त्याचा दर्जा हा सर्वोत्तम असेल यावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे या सुट्टीत बच्चेकंपनीना चांगले साहित्य वाचण्याचा नाही, तर पहाण्याचा देखील आस्वाद घेता येणार आहे.

प्रकाश नारायण संत यांच्या ‘वनवास’ या लोकप्रिय कादंबरीवर आधारित ‘लंपन’ मालिका म्हणजे, उत्कृष्ट साहित्याची मेजवानी ठरणार आहे. सध्या वेबमालिकांचे युग असले तरी त्यातील बहुतांश वेबमालिका या लहान मुलांनी बघू नयेत अशाच असतात. संपूर्ण कुटुंबासह बघता येतील अशा वेबमालिका फार क्वचित येतात. त्यातही मराठी वेबमालिका अगदी हातावर मोजण्यासारख्या. आता निपुण धर्माधिकारी यांनी ही कमी ओळखून लंपनची तयारी केली आहे. कोकणाच्या मातीत फुललेल्या. अगदी साध्या सोप्या, सरळ, सुटसुटीत भाषेतील या कथा कोणालाही भावतील अशाच आहेत. त्यातही लहान मुलांना त्या खास आवडणार आहेत.

शहरातील हा मुलगा त्याच्या आजी आजोबांसोबत रहाण्यासाठी गावी येतो. त्याची आईच त्याला एकट्या रहाणा-या आजी आजोबांसोबत रहाण्यासाठी ठेऊन जाते. मग या छोट्याची स्वतःबरोबर होणारी घुसमट, आई वडिलांची आठवण, आजी आजोबां सोबतची भांडणे, त्याची नवी शाळा, नवे वातावरण या सर्वांची जुळवाजुळव या लंपनमध्ये आहे. गावात आल्यावर लंपनची एकच तक्रार असते, त्याला कंटाळा येतोय. पण तिथे कंटाळा या शब्दाचा अर्थच कोणाला माहित नसतो. कंटाळा म्हणजे काय, हा प्रश्नच लंपनला परत ऐकावा लागतो. मिहीर गोडबोले यांनी निरागस लंपनची भूमिका सक्षमपणे पार पाडली आहे.

या लंपनची अनेक वैशिष्टय आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे, त्यातील कलाकार. यात आजीच्या भूमिकेत गीतांजली कुलकर्णी आहेत. तर आजोबाच्या भूमिकेत चंद्रकांत कुलकर्णी भेटणार आहेत.लंपनची एक जिवलग मैत्रीण या गावात होते. त्या मैत्रिणीची, म्हणजे सुमीची भूमिका अवनी भावेने केली आहे. लंपनच्या दादाच्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर आणि ताईच्या भूमिकेत कादंबरी कदम आहे. श्रीरंग गोडबोले, हृषिकेश देशपांडे, अमित पटवर्धन हे या लंपन वेब सिरिराजचे निर्मिती आहेत. त्यातही निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन असल्यानं मालिकेबाबत बरीच उत्सुकता आहे.

साहित्यिक प्रकाश नारायण संत यांच्या झुंबर, पंख, वनवास या कादंब-यांमधून हा लंपन कायम वाचकांना भेटला. मराठीजनांनी त्याच्यावर मनापासून प्रेम केले. प्रकाश नारायण संत यांच्या या कांदब-यांतून शाळकरी मुलांच्या चिमुकल्या भावविश्वाचा उलगडा झाला आहे. हेच उत्तम साहित्य वेबसिरिजच्या रुपात नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे. या सिरिजमधून याच कथा बघता येणार असल्याने त्यातील भाषेत काहीही बदल करण्यात आले नाहीत. त्यामुळे प्रकाश नारायण संत यांचे दर्जेदार साहित्य जसेच्या तसे नव्या पिढीपर्यंत पोहचणार आहे.

=====

Panchayat Season 3: ठरलं! या तारखेला रिलीज होणार पंचायत-३

श्रीकांथ-शिक्षीत समाजाला डोळस करणारा चित्रपट

=====

Spread the love

Related posts

Maidan OTT Release: आता घरबसल्या मोफत पाहा अजय देवगणचा जबरदस्त चित्रपट, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकाल

उत्तम शॉट आणि ५०० रुपयांचे बक्षीस, संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ च्या सेटवर अशा प्रकारे काम चालायचे

Panchayat Season 3: ठरलं! या तारखेला रिलीज होणार पंचायत-३

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More