Met Gala 2025 : काय आहे मेट गाला ? कोण करतो याचं आयोजन ? जाणून घ्या इतिहास

एकेकाळी न्यूयॉर्कच्या उच्चभ्रू समाजासाठी आयोजित केलेली एक चॅरिटी डिनर पार्टी आज जागतिक फॅशन विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची रात्री म्हणून ओळखली जाते — Met Gala!

मेट गाला म्हणजे नक्की काय?

प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या रात्री न्यूयॉर्कच्या मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये भरवला जाणारा मेट गाला हा फक्त एक रेड कार्पेट शो नाही, तर तो फॅशन, कला, सेलिब्रिटी आणि संस्कृती यांचा स्फोट असतो. यामध्ये जे काही दिसतं, ते फक्त कपडे नसतात — ती असते एक जिवंत, बोलकी कला!

2025 ची थीम: ‘Superfine – Tailoring Black Style’

यंदाचा मेट गाला (5 मे 2025) एक अनोखी रंगछटा घेऊन आला — ब्लॅक फॅशन आणि डॅन्डीझम चा सन्मान करणारी थीम आणि निळ्या रंगाच्या गालिच्यावर चाललेली फॅशनची परेड.

शाहरुख खानपासून रिहाना, शकिरा आणि एम्मा चेंबर्लेनसारखे ग्लोबल आयकॉन्स या निळ्या रेड कार्पेटवर झळकले.

मेट गालाचे २०२५ यंदाचे अतिथी

शाहरुख खान, रिहाना, कार्डी बी, झेन्डाया, हेली बीबर, किम कार्दाशियन, बिली आयलिश आणि बरेच नामवंत चेहरे यंदा मेट गालाच्या गालिच्यावर झळकले. थॉम ब्राउन, प्रबल गुरुंग, मार्क जेकब्स यांसारखे नामांकित डिझायनर्ससुद्धा आपल्या क्रिएशन्ससह उपस्थित होते.

यात एक गोष्ट स्पष्ट आहे — मेट गाला आता केवळ फॅशनचा इव्हेंट राहिलेला नाही, तो एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला आहे!

मेट गालाचा इतिहास

1948 साली एलेनॉर लॅम्बर्ट या प्रसिद्ध फॅशन पब्लिसिस्टने मेट गालाची सुरुवात केली. सुरुवातीला फक्त $50 मध्ये तिकीट मिळत असत आणि हे फक्त उच्चभ्रू न्यूयॉर्ककरांसाठी होते.

1995 मध्ये अ‍ॅना विंटूर (Vogue ची एडिटर-इन-चीफ) या कार्यक्रमाच्या प्रमुख झाल्यानंतर मेट गालामध्ये क्रांती झाली. तिने याला एक थीम-आधारित, ग्लॅमरस सेलिब्रिटी कार्यक्रमात रूपांतरित केलं.

मेट गाला कसे चालते?

उद्दिष्ट: कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी गोळा करणे तिकीट किंमत: सुमारे $75,000 (भारतात अंदाजे 62 लाख रुपये!) टेबल बुकिंग: $350,000 पेक्षा अधिक थीम: प्रत्येक वर्षी नवीन थीम ठरवली जाते, आणि पाहुण्यांनी त्यानुसार पोशाख करावा लागतो प्रवेश नियम: प्रत्येक अतिथीला अ‍ॅना विंटूरची मान्यता लागते!

सामान्य लोकांसाठी आहे का?

मेट गाला एक प्रायव्हेट इव्हेंट आहे, त्यामुळे आतमध्ये प्रवेश मिळत नाही. मात्र, रेड कार्पेट Vogue च्या वेबसाइट, YouTube आणि अनेक एंटरटेनमेंट पोर्टल्सवर लाईव्ह प्रसारित केला जातो. या कार्पेटवरच्या प्रत्येक पोशाखाकडे जगभरातील चाहते टक लावून पाहत असतात!

पार्टीनंतर, कॉस्च्युम इन्स्टिट्यूटचे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुले केले जाते.

मेट गालाचे नियम

स्मोकिंग बंदी सेल्फीज आणि सोशल मीडिया पोस्ट्सवर मर्यादा, 18 वर्षांखालील कोणालाही प्रवेश नाही ड्रेस कोडचा काटेकोर सन्मान अंतिम निर्णय: अ‍ॅना विंटूरचाच!

या कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळवणं हे सेलिब्रेटीज साठी प्रतिष्ठेच असतं.

Spread the love

Related posts

Kajol Horror Debut : माँ’ मध्ये काजोलचा वेगळा अंदाज, काय स्पेशल आहे चित्रपटात …

सचिन पिळगांवकरांचा खुलासा: “अमजद खानला ‘कितने आदमी थे’ डायलॉग म्हणता येत नव्हता, मी दिला कानमंत्र”

Mitali Mayekar Poolside Look: मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज पुन्हा चर्चेत, स्विमसूटमध्ये शेअर केला खास फोटो!

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More