‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’: महेश मांजरेकरचा साधू लूक प्रेक्षकांच्या चर्चेत

महेश वामन मांजरेकर लिखित व दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. टिझर पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात नक्कीच वाढली आहे, आणि या उत्कंठेत भर घातली ‘दुर्गे दुर्गट भारी’ या गाण्याने.

या गाण्यात महेश मांजरेकर यांचा साधू रूपातील लूक प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज ठरलं आहे. आतापर्यंत त्यांनी विविध सकारात्मक आणि नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत, पण साधूच्या अवतारात ते पहिल्यांदाच दिसत आहेत. त्यामुळे सर्वांचेच लक्ष त्यांच्या या नवीन लूकवर लागले आहे.

गाण्यातील महेश मांजरेकर यांचा लूक अतिशय प्रभावी आहे – डोक्यावर भगवा कपडा, गळाभोवती रुद्राक्षांची माळ, विस्कटलेले केस, लांब दाढी आणि हातात शंख – हे सर्व त्यांच्या व्यक्तिरेखेचे विशेष आकर्षण वाढवत आहे. चेहऱ्यावरील तीव्रता, डोळ्यांची चमक आणि व्यक्त होणारा करारी भाव प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच चाळवत आहे.

महेश मांजरेकर म्हणाले,

“आजपर्यंत मी अनेक भूमिका साकारल्या आहेत, परंतु साधूच्या व्यक्तिरेखेत मी कधीही दिसलो नव्हतो. हा लूक माझ्या नेहमीच्या लूकपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. यातली गूढता, ताकद आणि अध्यात्मिक छटा एकत्र येऊन या भूमिकेला एक आगळावेगळा आयाम मिळाला आहे. माझ्यासाठी ही एक नवी आणि वेगळी अभिनययात्रा ठरणार आहे.”

या भन्नाट लूक आणि प्रभावी गाण्यामुळे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आला आहे आणि प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली आहे.

झी स्टुडिओज प्रस्तुत, द ग्रेट मराठा एंटरटेनमेंट, सत्य सई फिल्म्स आणि क्रिझोल्ह निर्मित हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांचे सह-निर्माण असून, यात सिद्धार्थ बोडके, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री यांचे प्रमुख भूमिका आहेत.

Spread the love

Related posts

प्रियदर्शिनी इंदलकर – अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी झळकणार ‘लग्नाचा शॉट’मध्ये

झी स्टुडिओज घेऊन येत आहे रुबाबदार लव्हस्टोरी! ‘रुबाब’ चित्रपटाचा धडाकेबाज टीझर प्रदर्शित

‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा धमाल करायला सज्ज; ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीला चित्रपटगृहात

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More