नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि समीक्षकांनी कौतुक केलेल्या क्राईम ड्रामा ‘कोहरा’ चा दुसरा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नवीन केस, अधिक गडद रहस्यं आणि भावनिक संघर्षांची तीव्रता — यामुळे ‘कोहरा’ सिझन 2 आणखी प्रभावी ठरणार आहे.
जग्राणा मागे टाकत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरपाल गरुंडी (बरुण सोबती) यांची बदली आता डालेरपुरा पोलीस स्टेशन येथे होते. येथे त्यांना एक नवी कमांडिंग ऑफिसर धनवंत कौर (मोना सिंग) यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागणार आहे. स्वभावाने वेगळे असले तरी, प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची त्यांची जिद्द समान आहे. मात्र, भूतकाळापासून पळण्यासाठी उभारलेल्या भिंती हळूहळू कोसळू लागतात, आणि तपास अधिक वैयक्तिक व भावनिक वळण घेतो.
पहिल्या सिझनने भारतीय पोलिस प्रोसीजरल मालिकांसाठी एक नवा मापदंड निर्माण केला होता. त्याच परंपरेला पुढे नेत, ‘कोहरा’ सिझन 2 11 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुंजीत चोप्रा, दिग्गी सिसोदिया आणि सुदीप शर्मा यांनी निर्मित व लेखन केलेला हा सिझन पुन्हा एकदा पंजाबच्या थंड, धूसर वातावरणात घडतो — जिथे मौन अनेकदा कबुलीपेक्षा अधिक बोलकं असतं.
A Film Squad Production आणि Act Three यांच्या सहनिर्मितीत तयार झालेल्या या सिझनमध्ये सौरभ मल्होत्रा, सुदीप शर्मा, मनुज मित्रा आणि टीना थरवाणी हे निर्माते आहेत. विशेष म्हणजे, या सिझनमध्ये सुदीप शर्मा (फैसल रहमान यांच्यासोबत) दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळत असून, त्यामुळे कथाकथन अधिक जवळून आणि प्रभावीपणे उलगडतं.
याबाबत बोलताना सुदीप शर्मा म्हणतात,
“पुन्हा ‘कोहरा’कडे परतणं खूप उत्साहवर्धक आहे. पहिल्या सिझनमध्ये आपण माणसांमधील शांत ताण, भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील संघर्ष दाखवला. या सिझनमध्येही पंजाबचं वास्तव शक्य तितकं प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही मालिका भावनांचा रोलर-कोस्टर आहे. बरुण आणि मोना यांनी अप्रतिम काम केलं आहे.”
नेटफ्लिक्स इंडियाच्या सिरीज हेड तान्या बामी सांगतात,
“‘कोहरा’ ही आमच्यासाठी एक कल्ट क्लासिक आहे. तिची साधी पण प्रामाणिक मांडणीच तिला वेगळी ठरवते. नव्या शहरात, नव्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सिझन 2 अधिक खिळवून ठेवणारा आहे. सुदीप शर्मांच्या कारागिरीचं हे उत्तम उदाहरण आहे.”
बरुण सोबती पुन्हा गरुंडीच्या भूमिकेत आणि मोना सिंग नव्या, सूक्ष्म पण ताकदीच्या भूमिकेत दिसणार असल्याने, ‘कोहरा’ सिझन 2 भारतीय नॉयरचा आणखी एक थर उलगडतो. इथे सत्य हळूहळू समोर येतं, आणि धुक्यात लपलेली ओळखीचीच संकटं अधिक भयावह ठरतात.
‘कोहरा’ सिझन 2 – 11 फेब्रुवारीपासून, फक्त Netflix वर.