‘लेके प्रभू का नाम’ गाण्यात कॅटरिनाने ७ लूक्समधून दाखवला तिचा जलवा, गाण्यात दिसली झोया – टायगरची सिझलिंग केमिस्ट्री

बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानच्या लोकप्रियतेबद्दल आणि त्याच्या चाहत्यांबद्दल काय आणि किती बोलावे असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडतो. त्याच्याबद्दल बस नाम ही काफी है! एवढे जरी बोलले गेले तरी पुरेसे असते. मागील काही महिन्यांपासून बॉलिवूडसोबतच संपूर्ण जगभरातील लोकांना एकाच सिनेमाची प्रतीक्षा होती आणि तो सिनेमा म्हणजे ‘टायगर ३’. सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर लगेच लोकांच्या मनात या सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. मोठ्या काळानंतर पुन्हा एकदा सलमानला टायगरच्या भूमिकेत आता लवकरच पाहता येणार आहे.

नुकतेच ‘टायगर ३’ या सिनेमातील ‘ले के प्रभू का नाम’ हे पहिले गाणे प्रदर्शित केले गेले आहे. सलमान आणि कॅटरिना यांची सिझलिंग केमेस्ट्री दाखवणारे हे गाणे सध्या सोशल मीडियावर आणि लोकांच्या ओठांवर चांगलेच गाजत आहे. या गाण्यातील सर्वात जास्त चर्चेत येणाऱ्या बाबींपैकी एक बाब म्हणजे कॅटरिना कैफचे कमालीचे जबरदस्त लूक. हो ‘ले के प्रभू का नाम’ या गाण्यात कॅटरिना कैफचे ७ वेगवेगळे लुक्स आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे या सर्वच साठी लूक्समध्ये कॅट कमालीची मादक दिसत आहे. तिच्या या गाण्यातील लुक्सबद्दल आणि गाण्याबद्दल कॅटरिनाने तिचे मत व्यक्त केले.

कॅटरिनाने सांगितले की, ले के प्रभू का नाम हे गाणे तिचे सर्वात आवडते गाणे आहे. तुर्कस्तानच्या कॅपाडोशियामध्ये हे गाणे शूट झाले असून ‘माशाल्लाह’ आणि ‘स्वॅग से स्वागत’ या दोन गाण्यांनंतर या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन तिच्या आवडत्या वैभवी मर्चंटने केले आहे. गाण्यात तिचे दिसणारे कमालीचे सुंदर आणि बोल्ड लूक अनिता श्रॉफ यांनी डिझाइन केले आहेत. पुढे कॅटरिनाने तिच्या या आकर्षक लूकचे श्रेय अनिता यांना दिले आहे. ‘टायगर’ फ्रँचायझी सिनेमामधील गाणे हे चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरले आहे. या ‘ले के प्रभू का नाम’ गाण्यात वैभवी नेहमी सारखे उत्तम काम केले असून, झोया आणि टायगरमधील केमिस्ट्री उत्तम पद्धतीने सादर केली आहे.

पुढे कॅटरिनाने हे देखील काबुल केले की, तिला सलमान खानसोबत डान्स करायला खूप आवडते. त्याच्यासोबत गाण्यात डान्स करणे म्हणजे एक सुंदर आणि हटके अनुभव असतो. या गाण्यात देखील आम्ही शूटिंगच्या वेळेस खूप धमाल केली. शूटिंगच्या अनेक आठवणी आमच्यासोबत आहेत. तिने यावेळी या गाण्याला देखील मागील दोन सिनेमातील गाण्यांप्रमाणे प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास देखील व्यक्त केला.

दरम्यान नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ले के प्रभू का नाम’ या गाण्याचे शब्द अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून गाण्याला संगीत प्रीतम यांनी दिले आहेत. तर या गाण्याला अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी आवाज दिला आहे. मुख्य बाब म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने तब्बल १० वर्षांनी अरिजित सिंगने सलमान खानच्या सिनेमात गाणे गायले आहे. दोघांमध्ये झालेल्या एका वादामुळे मधले काही वर्ष सलमान खानने त्याच्या सिनेमासाठी अरिजित कडून एकही गाणे गाऊन घेतले नव्हते. तत्पूर्वी ‘टायगर ३’ हा सिनेमा यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर अर्थात १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमान खान व कॅटरिना कैफ याच्यासोबत खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता इम्रान हाशमी दिसणार आहे. हा चित्रपट यश राज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा पाचवा भाग असेल. पुन्हा एकदा प्रेक्षक मोठ्या पडद्यावर सलमान खान आणि कॅटरिना कैफ या त्यांची आवडत्या जोडीला बघ्याची आतुर झाले आहेत.

Spread the love

Related posts

आदर्श सून साकारत मिळवली लोकप्रियता, अभिनयसोबतच राजकारणात देखील तयार केली ओळख जाणून घ्या स्मृती ईराणी यांचा प्रवास

Mr. & Mrs. Mahi Movie Review : भावनिक यशाचा षटकार!

होय महाराजा: कॉमेडीचा बहर, क्राईम चा कहर!

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More