कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका इंद्रायणी सध्या एका अत्यंत नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे. प्रेक्षक जेव्हापासून इंदू आणि अधूच्या नात्याचा प्रवास पाहत आहेत, तेव्हापासून त्यांच्या लग्नाची प्रतिक्षा होती. अखेर, या दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. मात्र या आनंदी क्षणानंतर लगेचच त्यांच्या संसारावर संकटांची मालिका सुरू झाली आहे.
इंदू आणि अधूच्या नात्याला आनंदीबाई आणि गोपाळने मोठं आव्हान दिलं आहे. या दोघांचंही ठाम मत आहे – “हा संसार सुखाचा होऊ द्यायचा नाही!” इतक्यावर गोष्टी थांबत नाहीत. गोपाळ अनेक वर्षांनी दिग्रसकरांच्या वाड्यात परततो आणि तोही कायमस्वरूपी. कारण? शंकुतलाला झालेला पोटाचा कॅन्सर. तिच्या उपचारांची जबाबदारी गोपाळ स्वीकारतो आणि याच निमित्ताने तो पुन्हा वाड्यात प्रवेश करतो.
पण त्याचं परतणं केवळ काळजीपोटी नाही. त्यामागे आहे एक गूढ हेतू – इंदू आणि अधूचा नव्याने सुरू झालेला संसार उध्वस्त करण्याचा. गोपाळच्या या योजना त्याला यशस्वी ठरणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
दुसऱ्या बाजूला, इंदू तिच्या संसारासाठी मनापासून झगडते आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या अधूवर जीवघेणा हल्ला होतो. पण त्या धक्कादायक प्रसंगात इंदू आणि अधू एकमेकांची साथ देत परिस्थितीवर मात करतात. अधूचा रुसवा दूर होतो आणि त्यांच्या नात्याला नव्याने सुरुवात होते.
मात्र, नव्या सुरुवातीलाच गोपाळचं परतणं आणि आनंदीबाईंची योजना पुन्हा त्यांच्या नात्याला धक्का देणारं ठरतं. एक नवाच वादळ त्यांच्या संसारावर घोंगावतंय.
गोपाळ आपल्या प्लॅनमध्ये यशस्वी होईल का?
इंदू आणि अधू हे नवं संकट कसं पार करतील?
त्यांच्या नात्याची कसोटी यातून कशी लागेल?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रेक्षकांनी नक्की पहावी इंद्रायणी ही मालिका.
२९ जून, रविवार — दुपारी १ वा. आणि संध्याकाळी ७ वा. फक्त कलर्स मराठीवर!