“मी दिवसाला १० तास काम करते”: दीपिकाच्या ८ तासांच्या मागणीवर जिनिलिया देशमुखचं मत

Genelia Deshmukh On Deepika Padukone’s 8-Hour Shift Demand: जिनिलिया देशमुख लवकरच ‘सितारे जमीन पर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार आहे. सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान जिनिलियाने एका चर्चेत तिच्या कामाच्या वेळांबाबत मोकळेपणाने मत मांडलं आणि दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या शिफ्टबाबतही प्रतिक्रिया दिली.

‘झूम’ या माध्यमाशी बोलताना जिनिलियाने सांगितलं, “हे खूप कठीण आहे, पण अशक्य नाही. मी स्वतः दिवसाला १० तास काम करते. कधी कधी दिग्दर्शक ११-१२ तासांच्या शिफ्टही घेतात. मला वाटतं, हे सगळं ठीक आहे, फक्त आपण आपल्या वेळेचं योग्य नियोजन केलं पाहिजे. एखाद्या प्रोजेक्टसाठी एक-दोन दिवस जास्तीचं काम करणं हा समजूतदारपणाचाच भाग आहे.”

या विषयाचं मूळ दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटाशी संबंधित आहे. या चित्रपटातून दीपिकाने एक्झिट घेतल्याचं समोर आलं. आठ तासांची शिफ्ट आणि इतर काही अटींवरून दोघांमध्ये मतभेद झाले. संदीप या अटींना तयार नव्हते. त्यानंतर दीपिकाने चित्रपटातून माघार घेतली आणि तिच्या जागी तृप्ती डिमरीची निवड करण्यात आली.

याचबरोबर दीपिकाच्या या निर्णयाला अनेक दिग्गजांनी पाठिंबा दिला. प्रसिद्ध दिग्दर्शक मणी रत्नम, अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री नेहा धुपिया यांनी दीपिकाच्या आठ तासांच्या मागणीला योग्य ठरवलं.

दरम्यान, जिनिलिया देशमुखच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट आमिर खानच्या निर्मितीत आणि आर. एस. प्रसन्न यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे. यामध्ये जिनिलिया पहिल्यांदाच आमिर खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

याशिवाय जिनिलिया ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटातसुद्धा झळकणार आहे. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रितेश देशमुख, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, अभिषेक बच्चनसारख्या कलाकारांची मांदियाळी असणार आहे. तिच्या भूमिकेबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Spread the love

Related posts

Baaghi 4 FIRST Song ‘Guzaara’ Out! Tiger Shroff & Harnaaz Sandhu Bring Love And Heartbreak To Life

Sholay 50 years : Dharmendra’s Salary Will Leave You Speechless – Here’s What Every Star Earned

Ajay Devgn Returns to Comedy with ‘Son of Sardaar 2’, Set for July 25 Release

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More