…तर ‘या’ दिवसापासून होणार बहुप्रतिक्षित ‘डान्स प्लस’ शो चा नवीन सीझन, प्रेक्षकांसाठी असणार अनेक सरप्राइजेस

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आपण पाहिले तर आपल्याला रियॅलिटी शोचा नुसता पाऊस पाहायला मिळतो. एक शो संपला की, दुसरा लगेच त्याच्या जागी चालू होतो. प्रत्येक चॅनेलमध्ये एक खास स्लॉट रियॅलिटी शो साठी राखीव ठेवला जातो. रियॅलिटी शोमुळे अनेक चांगले चांगले कलाकार मनोरंजनविश्वाला मिळाले आहेत. या रियॅलिटी शोची तुफान क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. असाच एक डान्सवर आधारित लोकप्रिय रियॅलिटी शो म्हणजे ‘डान्स प्लस’. रेमो डिसुझाचा अतिशय लोकप्रिय झालेला आणि विविध सिझन तुफान गाजलेला डान्स प्लस हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by StarPlus (@starplus)

लवकरच हा शो च्या सातव्या सिझनला सुरुवात होत आहे. सध्या या शोचे नवनवीन प्रोमो टीव्हीवर झळकत आहे. त्यामुळे या शोचे चाहते सध्या खूपच खुश आहेत. तब्बल आठ वर्षांपूर्वी हा शो सुरु झाला आणि आता याचा सातवा सिझन येऊ घातला आहे. या शोच्या निमित्ताने पुन्हा एकदा विविध प्रकारचे धमाकेदार परफॉर्मन्स सर्वांना पाहायला मिळणार आहेत. रेमो डिसुझा आणि शोचे शक्ती मोहन, पुनीत पाठक, राहुल शेट्टी हे तीन कप्तान यांची एक मस्त केमिस्ट्री पुन्हा दिसणार आहे. सोबतच राघव जुवालचे खुमासदार सूत्रसंचालन आणि त्याचे जोक्स अनुभवण्यासाठी सगळेच खूपच उत्सुक आहेत. या शोचे प्रोमो आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येईल या डान्स प्लस शोचा हा आठवा सिझन खूपच खास असणार आहे.

डान्स प्लस या शोचे प्रोमो पाहून आपल्याला समजेल की, हा सिझन द ग्रेट डान्स मास्टर मायकल जॅक्सनला एक अनोखी श्रद्धांजली देणारा ठरणार आहे. मात्र या सोबतच भारतीय संस्कृती घराघरात पोहचवण्याचे प्रयत्न देखील केले जाणार आहे. स्टार प्लस चॅनेलचा प्रतिष्ठित शो त्याचा यशस्वी होण्याचा इतिहास जपण्यास सज्ज होत असून, टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर किंबहुना रियॅलिटी शोवर पुन्हा वर्चस्व गाजवण्यासाठी तयार झाला आहे. हा शो येत्या १६ डिसेंबरपासून शनिवार आणि रविवार संध्याकाळी ६ वाजता प्रसारित होणार आहे.

Spread the love

Related posts

The Roshans: Netflix Docu-Series Explores a Bollywood Legacy

आदर्श सून साकारत मिळवली लोकप्रियता, अभिनयसोबतच राजकारणात देखील तयार केली ओळख जाणून घ्या स्मृती ईराणी यांचा प्रवास

सईच्या घरी आली नवी पाहुणी! नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More