सलमान खानची मोठी घोषणा: बिग बॉस मराठी सिझन ६ चं सूत्रसंचालन पुन्हा रितेश देशमुखकडे!

कलर्स मराठीवर नुकताच झळकलेला बिग बॉस मराठी सिझन ६ चा टीझर महाराष्ट्रभर प्रचंड चर्चेत होता. त्या टीझरनंतर प्रेक्षकांना सर्वाधिक प्रतीक्षा होती ती—या नव्या सीझनचा होस्ट कोण असणार?

सगळ्यांची एकच मनापासून इच्छा स्पष्ट होती: “भाऊनेच परत यावं!”

आणि ही इच्छा पूर्ण झाली ती थेट बिग बॉस हिंदीच्या भव्य मंचावर!

भारतभरातील प्रेक्षकांचे लाडके सलमान खान स्वतः पुढे येत मोठी घोषणा करत म्हणाले की बिग बॉस मराठी सिझन ६चं सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार आहेत.

भाईकडून भाऊची अशी स्टायलिश ओळख होणं हा क्षण चाहत्यांसाठी भावनिक आणि अभिमानास्पद ठरला. दोन सुपरस्टार्स—एकाच मंचावर, एकाच क्षणी—एकमेकांचं कौतुक करताना पाहून सोशल मीडियावर उत्साह उंचावला.

सलमान खानने रितेशचं स्वागत करत म्हणाले,

“बिग बॉस नंतर देखील एंटरटेनमेंट थांबणार नाही… कारण बिग बॉस मराठी सुरू होणार आहे आणि तो घेऊन येणार आहे माझा लाडका भाऊ रितेश देशमुख! तू हिंदी संपल्यानंतर देशाच्या एंटरटेनमेंटची जबाबदारी स्वतःवर घेतली आहेस. यावेळी मराठीत काय नवीन असणार?”

यावर रितेश देशमुखने हसत उत्तर दिलं,

“सर्वप्रथम तुम्हाला ब्लॉकबस्टर सिझनसाठी खूप शुभेच्छा. मी रोज पाहतोय आणि प्रेक्षकांनाही हा सिझन प्रचंड आवडतो आहे. यंदा बिग बॉस मराठीत एक खास ट्विस्ट आहे—घरात प्रवेश एका दरवाज्यातून होणार असला तरी आत गेल्यावर स्पर्धकांचं स्वागत अनेक दरवाजे करतील. प्रत्येक दरवाज्यामागे काहीतरी वेगळं… काही चांगलं, काही आश्चर्यचकित करणारं, तर काही धक्कादायक असणार!”

सलमानने मागील सिझनचं कौतुक करत येणाऱ्या सिझनसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच कार्यक्रमात रितेशने एक एलिमिनेशनही केलं आणि स्पर्धकांशी संवाद साधला.

सलमानने शेवटी असंही सांगितलं की,

“हा नवा मराठी सिझन मी नक्की बघणार!”

मंचावर सलमान–रितेशची जुगलबंदी पाहताच सोशल मीडिया तापला आहे. सगळीकडे एकच चर्चा—बिग बॉस मराठी, रितेश देशमुख आणि सलमान खानचा भव्य अनाउन्समेंट मोमेंट!

दोन सुपरस्टार्सची एकत्र उपस्थिती पाहून लोकांमध्ये एकच आवाज घुमतोय—

“दार उघडणार… नशिब पालटणार… भाऊ येणार!”

बिग बॉस मराठीचा हा नवा सिझन धमाकेदार ठरणार यात शंका नाही. लवकरच सिझन ६ परततोय तुमच्या कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

Spread the love

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More