दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊंच्या नव्या प्रोमोमुळे ‘बिग बॉस मराठी 6’ची उत्सुकता शिगेला

“दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार आणि रहस्यमय थीमसोबत रितेश भाऊंनी बिग बॉस मराठी सिझन ६ चा बहुप्रतिक्षित प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. आधीच सहाव्या सीझनची हवा महाराष्ट्रभर पसरलेली असताना, या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढवली आहे. यंदाचा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, घरातील सदस्यांच्या नशिबाला कलाटणी देणारा ठरणार असल्याचं या प्रोमोमधून स्पष्ट दिसून येतंय.

“फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत… आणि आपण शब्द दिला की मागे हटत नाही…” या कडक आणि भारदस्त संवादातून रितेश भाऊंनी यंदाच्या सीझनचा सूर आधीच ठरवून टाकला आहे. दारामागे नक्की काय लपलं आहे? कोणत्या ट्विस्टमुळे खेळाडूंच्या नशिबाचा खेळ पालटणार? कोण पास होणार आणि कोण फेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दार उघडल्यावरच मिळणार आहेत. बिग बॉस मराठी सिझन ६ पाहायला विसरू नका – ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वाजता, कलर्स मराठी आणि JioHotstar वर.

प्रोमो रिलीज होताच रितेश भाऊंचे कोड्यातून घर आणि गेमची थीम उलगडणारे संवाद हे त्याचं प्रमुख आकर्षण ठरत आहेत. प्रत्येक सीझनप्रमाणे यंदाही रितेश भाऊ काहीतरी वेगळं, हटके आणि सरप्राइझ देताना दिसत आहेत. नवा लूक, खास स्वॅग आणि दमदार डायलॉग्स हे त्यांच्या प्रोमोचं कायमचं वैशिष्ट्य राहिलं असून, यंदाही त्याला अपवाद नाही. एका हटके अवतारात भाऊ “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” ही टॅगलाईन प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर सादर करताना दिसतात.

“ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ…” या ओळी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होण्याची शक्यता असून, रितेश भाऊंचा कडक अंदाज आणि प्रोमोमधील संवाद यंदाच्या सीझनचा परफेक्ट ‘मूड सेटर’ ठरत आहेत.

घराची भव्य रचना, शेकडो दार-खिडक्यांनी सजलेला जंगी सेट आणि दारापल्याड लपलेलं सरप्राइज—हे सगळं मिळून प्रत्येक क्षणी खेळाचा डाव बदलू शकतो, असा ठाम इशारा हा प्रोमो देतो. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने या नव्या सीझनची वाट पाहत आहे. घर नक्की कसं असणार? कोणते सरप्राइझेस प्रेक्षकांना आणि सदस्यांना थक्क करणार? आणि क्षणात खेळ कसा पलटणार? हे प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

=====

हे देखील वाचा :  प्राजक्ता माळीची Bigg Boss Marathi 6 मध्ये एन्ट्री? अवघ्या दोन शब्दांत दिलं थेट उत्तर

=====

Spread the love

Related posts

प्राजक्ता माळीची Bigg Boss Marathi 6 मध्ये एन्ट्री? अवघ्या दोन शब्दांत दिलं थेट उत्तर

सलमान खानची मोठी घोषणा: बिग बॉस मराठी सिझन ६ चं सूत्रसंचालन पुन्हा रितेश देशमुखकडे!

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More