‘क्रिकेटवर चित्रपट करणे हा माझ्या बकेट-लिस्टचा भाग आहे!’ : आयुष्मान खुराना

भारतात क्रिकेट हा एक खेळ नाही तर एक पूजा मानली जाते. तो एक धर्म समजला जातो. प्रत्येक भारतीय कुठे ना कुठे या खेळाशी जोडला गेला आहे. हा एक खेळ संपूर्ण देशाला एकत्र आणण्याचे मोठे काम करतो. नुकतीच क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा संपन्न झाली. जरी भारत या स्पर्धेचा विजेता ठरला नसला तरी लोकांची मने मात्र त्याने जिंकली. या खेळाचे समर्थक आमपासून खासपर्यंत सगळेच आहे. याच क्रिकेटचा आणि सिनेसृष्टीचा खूपच जवळचा संबंध आहे. अशा या खेळावर आजवर अनेक सिनेमे येऊन गेले. अनेकांना क्रिकेटशी संबंधित चित्रपटामध्ये काम करण्याची खूपच इच्छा असते.

अनेक कलाकारांची ही इच्छा पूर्ण होते, तर काही ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. असाच एक अभिनेता आहे ज्याने त्याला या खेळाशी संबंधित सिनेमात काम करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे. हा अभिनेता आहे, आयुष्यमान खुराणा. बॉलिवूडमधील आजच्या घडीचा अतिशय प्रतिभासंपन्न आणि हुशार अभिनेता म्हणून आयुषमान खुराणा ओळखला जातो. त्याने त्याच्या करियरमध्ये अतिशय उत्तमोत्तम सिनेमे केले असून, आता त्याला क्रिकेटवर आधारित सिनेमात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे.

आयुष्यमान खुराणाने सांगितले की, त्याच्यात असणारे क्रिकेटचे स्किल या सिनेमाच्या निमित्ताने कामी येतील. आयुष्यमानने सांगितले की, त्याचा क्रिकेटचा अभ्यास आणि निरीक्षण खूपच चांगले आहे. त्याने जगातील सर्वच क्रिकेट प्रेमींशी चर्चा केली असून, तो देखील क्रिकेटचा कट्टर समर्थक असल्याचे त्याने सांगितले.

आयुष्यमानने सांगितले की, तो पंजाबमध्ये अंडर – 19 चा जिल्हास्तरीय पातळीवरील क्रिकेटर होता. मुख्य म्हणजे तो हा खेळ अतिशय मनापासून आणि जिवतोडून खेळायचा. क्रिकेटवर सिनेमा बनवणे ही त्याच्या बकेट लिस्टमधील एक इच्छा होती आणि त्याला आशा आहे की त्याची ही इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होईल. मागच्या बऱ्याच काळापासून सतत चर्चा होत आहे की, आयुष्यमान खुराणा माजी क्रिकेटर सौरव गांगुलीवर तयार होणाऱ्या बायोपिकमध्ये त्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. या बातमीमध्ये असणारी सत्यता अद्यापही समोर आली नसली तरी जर ही बातमी खरी असले तर नक्कीच सर्वच सिनेप्रेमींना याचा आनंद होईल.

आयुष्यमान खुराणाला ‘विक्की डोनर’, ‘दम लगा के हईशा’, ‘आर्टिकल 15’, ‘अंधाधुन’ अशा उत्तम सिनेमांसाठी ओळखले जाते. त्याने त्याच्या या सिनेमांमधून प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप पडली आहे. आता त्याला सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये पाहता आले तर त्याच्या फॅन्सला नक्कीच एक खास गिफ्ट असणार आहे.

Spread the love

Related posts

आदर्श सून साकारत मिळवली लोकप्रियता, अभिनयसोबतच राजकारणात देखील तयार केली ओळख जाणून घ्या स्मृती ईराणी यांचा प्रवास

सईच्या घरी आली नवी पाहुणी! नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

डंकी सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ गाणे प्रदर्शित, सोनू निगमच्या आवाजातून जाणवते देशाबद्दलची तडफड

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More