दणक्यात साजऱ्या झालेल्या अप्पीच्या डोहाळे जेवणाला लाभली चक्क माधुरी दीक्षितची उपस्थित

संपूर्ण महाराष्ट्राला आता फक्त एकाच सोहळ्याची उत्सुकता लागलेली आहे. तो सोहळा म्हणजे झी मराठी पुरस्कार २०२३. काही दिवसांपूर्वी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात हे पुरस्कार संपन्न झाले. आता लवकरच हा सोहळा प्रेक्षकांना टीव्हीवर अनुभवता येणार आहे. या सोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होताना दिसत आहे. या कार्यक्रमादरम्यान सादर झालेले विविध परफॉर्मन्स, विविध स्किट यांची जोरदार चर्चा रंगत आहे.

अनेक बहारदार सादरीकरणांनी रंगलेल्या या सोहळ्यामध्ये चक्क एका अभिनेत्रीचे आगळेवेगळे डोहाळेजेवण देखील संपन्न झाले आहे. या हटके डोहाळे जेवणाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हे डोहाळे जेवण होते ते सगळ्यांच्या लाडक्या अप्पीचे. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये सध्या अप्पी प्रेग्नेंट असल्याचे दाखवले जात आहे. अशातच आता याला अनुसरूनच या पुरस्कार सोहळ्यामध्ये तिचे चक्क डोहाळे जेवण देखील साजरे करण्यात आले. घरचे कार्य असल्याने या पुरस्कार सोहळ्याला सर्वानीच हजेरी लावली होती. यामुळे त्यांच्या उपस्थितीमध्ये अप्पीच्या डोहाळे जेवणाचा देखील एक भन्नाट समारंभ इथे पार पडला.

मालिका विश्वातील मानाचा तसेच झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड’. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. झी मराठीच्या सर्व नायिकांनी मिळून अप्पीचे डोहाळे पुरवले, कलेक्टर अप्पीची PA म्हणजेच छोट्या छकुलीने एक धमाकेदार नृत्य केलं. सोबतच ह्या डोहाळेजेवण कार्यक्रमात हजेरी लावली ती बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने.

या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमादरम्यान माधुरीने अर्जुनला अप्पीची काळजी घेण्याचा प्रेमाचा सल्ला पण दिला. या डोहाळेजेवण कार्यक्रमात अप्पीचं कौतुक करायला आलेल्या सगळ्यांनी पेढा की बर्फी अशी गोड विचारणा देखील केली. काय असेल ह्या डोहाळेजेवण कार्यक्रमात पेढा की बर्फी ? तेव्हा पाहायला विसरू नका ‘अप्पीच्या डोहाळेजेवणाचा’ हा धमाकेदार कार्यक्रम ‘झी मराठी अवॉर्ड २०२३’, शनिवार ४ नोव्हेंबर, संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर. घरचं कार्य आहे सहकुटुंब सर्वाना आग्रहाचं निमंत्रण.

Spread the love

Related posts

Sprite India Welcomes Sharvari as New Brand Ambassador for ‘Thand Rakh’ Campaign

The Roshans: Netflix Docu-Series Explores a Bollywood Legacy

आदर्श सून साकारत मिळवली लोकप्रियता, अभिनयसोबतच राजकारणात देखील तयार केली ओळख जाणून घ्या स्मृती ईराणी यांचा प्रवास

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More