११ वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश ,स्वप्नील आणि सईची मैत्री झळकणार मोठ्या पडद्यावर

टिक टिक वाजते डोक्यात….हे गाण्याचे बोल कानावर पडले की, आपसूकच डोळ्यासमोर येतो तो दुनियादारी हा सिनेमा. आज तब्बल १३ वर्षांनी देखील सिनेमाची प्रेक्षकांवर असलेली जादू कायम आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने लोकप्रियतेचे रेकॉर्ड केले. निखळ मैत्री आणि अविरत प्रेम यांचे सुंदर चित्रण सिनेमात दाखवण्यात आले आहे. त्यानंतर अनेकदा प्रेक्षकांनी या सिनेमाचा दुसरा भाग काढण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वीच अनेक शहरांमध्ये हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा देखील सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

मात्र आता खरंच दुनियादारी सिनेमाचा दुसरा भाग येत आहे की, काय? असा प्रश्न सर्वाना पडताना दिसत आहे. कारण लवकरच ए.वी.के पिक्चरस्, व्हिडीओ पॅलेस आणि मैटाडोर प्रोडक्शन प्रस्तुत एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आणि अन्य बाबी जरी गुलदस्त्यात असल्या तरी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, संजय जाधव यांची टीम पाहूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल आणि धडधड पण नक्कीच झाली असेल. अशीच काहीशी उत्सुकता आता वाढणार आहे. ही टीम आता पुन्हा नवीन चित्रपट घेऊन येत आहे.

चित्रपटाची पूर्वतयारी आता सुरु झाली असून ही टीम प्रेक्षकांना ११ वर्षांनंतर भेटीस येणार आहे. या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. तर या सिनेमाचे निर्माते स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन आहेत.

चित्रपटाबाबत अमेय खोपकर म्हणतात, ” संजय जाधव यांचासारखा धमाकेदार दिग्दर्शक यांच्यासोबत येरे येरे पैसा, येरे येरे पैसा 3, कलावती हे यशस्वी चित्रपट केल्यानंतर आता हा नवाकोरा चित्रपट करायला मिळतो आहे. अंकुश, सई, स्वप्नील यांसारखे कमाल कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या टीमसोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला असून ही टीम पुन्हा एकत्र आल्यावर मोठा गेम तर नक्कीच होणार आणि चित्रपट गाजणारच!”

Spread the love

Related posts

‘बाई गं’ मराठी मनोरंजनविश्वातील “हा” सुपरस्टार एकाच चित्रपटात दिसणार सहा अभिनेत्रींसोबत

होय महाराजा: कॉमेडीचा बहर, क्राईम चा कहर!

Juna Furniture Movie Review: ‘भक्कम’ जुनं फर्निचर!

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More