एनसीपीएमध्ये पुन्हा सुरु होतोय मराठी नाटकांचा वार्षिकोत्सव: प्रतिबिंब नाट्योत्सव
मराठी नाट्यविश्वात चैतन्य निर्माण करून प्रेरणा, प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याच्या उद्देश्याने प्रतिवर्षी आयोजित केला जाणारा ‘प्रतिबिंब: मराठी नाट्योत्सव हा यंदाच्या उन्हाळी सुट्टीत म्हणजे दिनांक ५ ते ७ मेच्या दरम्यान एनसीपीएमध्ये आयोजित केला जात आहे. याबाबत एनसीपीएचे थियेटर आणि फिल्म विभागाचे प्रमुख ब्रूस गथ्री ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगतात ’ यंदाच्या प्रतिबिंब मराठी नाट्योत्सवाचा शुभारंभ हा दर्पण पारितोषिक विजेत्या नाटकाने होणार आहे.