Kalki 2898 AD: अश्वत्थामा, अमिताभ आणि आधुनिक तंत्रज्ञान

पांडवांचे गुरू द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामा याला अमरत्वाचा शाप मिळालेला आहे. अश्वत्थामाने महाभारत युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र द्रौपदीच्या पाच मुलांची हत्याही याच अश्वत्थाम्याच्या हातून झाली. एवढेच करुन अश्वत्थामा थांबला नाही तर अभिमन्यु पुत्र परिक्षिताचा त्यानं गर्भातच मृत्यू व्हावा म्हणून ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. यावेळी श्रीकृष्णानं ब्रह्मास्त्र रोखले. श्रीकृष्णानं क्रोधित होऊन त्याच्या कपाळावरील मणी काढून घेत अमरत्वाचा शाप दिला. तेव्हापासून कपाळावरची जखम घेत महाभारतापासूनचा एकमेव जीवीत योद्धा म्हणून अश्वत्थामाचा उल्लेख करण्यात येतो. या रहस्यानं परिपूर्ण असलेल्या अश्वत्थामाला आता मोठ्या पडद्यावर बघता येणार आहे. (Amitabh Bachchan is playing Ashwatthama in Kalki)

सुपरस्टार अमिताभ बच्चन ‘कल्की 2898 एडी‘ या चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यात अमिताभ बच्चन तरुण दाखवण्यात आले आहेत. नुकताच ‘कल्की 2898 एडी’ चा एक टिजर प्रदर्शित झाला. त्यात अमिताभ यांचे हे नवे रुप पाहून त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. २७ जून २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर येणारा ‘कल्की 2898 एडी’ हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक बिगबजेट चित्रपट असून यात अमिताभ सोबत प्रभासही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नाग अश्विन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

२०२४ मधील सर्वाधिक चर्चित चित्रपट असलेल्या ‘कल्की 2898 एडी’ ची पहिली झलक नुकतीच बघयला मिळाली. यात ८१ वर्षाचे सुपरस्टार अमिताभ बच्चन गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामाच्या भूमिकेत आहेत. या एक मिनिटाच्या टिझर मध्ये अमिताभ बच्चन यांचे तरुण रुपही पहायला मिळाले आहे. ही सर्व तंत्रज्ञानाची किमया असून अमिताभ बच्चन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आगामी ‘कल्की 2898 एडी’ अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहेत. प्रथम त्या चित्रपटातील तंत्रज्ञानाची चर्चा झाली. अमिताभ बच्चन यांना अश्वत्थामाच्या भूमिकेसाठी साईन करण्यात आल्यापासून अमिताभ यांच्या वयाचा दाखला देण्यात येत होता. मात्र चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यावर अमिताभ बच्चन यांच्याशिवाय अश्वत्थामाच्या भूमिकेत कोणीही फिट बसू शकत नव्हते हे सिद्ध झाले आहे.

अमिताभ बच्चन यांना अश्वत्थामा बनवण्यासाठी निर्मात्यांना खूप मेहनत घ्यावी लागली आहे. ‘कल्की 2898 एडी’ च्या टीझरमध्ये अमिताभ एका जुन्या मंदिरात शिवलिंगाची पूजा करताना दिसत आहेत. त्यात त्यांचा तरुण लुक कुठल्या तंत्रज्ञानामुळे आला, हे जाणण्याची उत्सुकता आहे. अमिताभ यांचा हा तरुण लूक येण्यासाठी कोणत्याही VFX चा वापर केलेला नाही. हा डी-एजिंग तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये हे तंत्र वापरले गेले आहे. यात अभिनेता किंवा अभिनेत्री तरुण दिसण्यासाठी डी-एजिंग तंत्रज्ञानाचा वापर होतो. हे सीन बहुधा फ्लॅशबॅक असतात. कॉम्प्युटर जनरेटेड इमेज किंवा टच अप द्वारे हा चमत्कार केला जातो.

या तंत्राने अभिनेत्याच्या चेहऱ्यावर एक काळा ठिपका तयार केला जातो. त्यातून अभिनेत्याचे थ्रीडी मॉडेल तयार केले जाते. यानंतर, अभिनेत्याच्या डोक्याच्या हालचालीनुसार हालचाल केली जाते. नंतर या हालचाली ट्रेस करुन त्या अभिनेत्याच्या चेहऱ्याशी जोडल्या जातात. हॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेले हे तंत्रज्ञान बॉलिवूडमध्येही अलिकडे वापरले जात आहे. शाहरुख खानच्या ‘रा.वन’ चित्रपटात याचा वापर झाला होता. रजनीकांत यांच्या ‘थलाईवर 171’ मध्येही डी-एजिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ‘कल्की 2898 एडी’ हा या वर्षातील सर्वात महागडा चित्रपट आहे.

वास्तविक हा चित्रपट ९ मे रोजी मोठ्या पडद्यावर येणार होता. मात्र देशात चालू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. कल्की 2989 AD मध्ये प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नाग अश्विन यांनीच चित्रपटासाचे दिग्दर्शन आणि सहलेखन केले आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये पहिल्यांदा या चित्रपटाची घोषणा झाली. मात्र कोव्हिड महामारीमुळे चित्रपट लांबला गेला. त्यातील तंत्रज्ञानामुळे चित्रपटाचे बजेट ६०० करोडच्याही पुढे गेले आहे. यात प्रभासच्या भुमिकेबद्दल जेवढी उत्सुकता आहे, तेवढीच उत्सुकता बीग बी अमिताभ बच्चन यांच्या अश्वत्थामाचीही आहे.

=====

अवघं बॉलिवूड गोळा झालंय…वेलकम टू द जंगल

Lahore1947: १७ वर्षांनी लाहोरची हवा घेऊन प्रीती मोठ्या पडद्यावर

=====

Spread the love

Related posts

बॉलिवूडची ”पंगा क्वीन ते लोकसभा खासदार” जाणून घ्या कंगना रणौतचा प्रवास….

“अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब…” म्हणत सोनू निगमने निकालानंतर शेअर केली पोस्ट

कंगना रणौतच्या मोठ्या विजयानंतर अनुपम खेर यांनी पोस्ट शेअर करत लिहिले, “आज मंडीमधील लोकांसाठी…’

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More