अल्लू अर्जुन अभिनीत ‘पुष्पा 2: द रुल’या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर झाले प्रदर्शित

Pushpa 2: The Rule

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात ‘पुष्पा’ची चर्चा आहे. अलीकडेच, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या व्हिडिओने प्रेक्षक उत्साहित झाले असून, ह्या व्हिडिओने ‘पुष्पा’ विषयीची उत्सुकता अधिक ताणली आहे. पुष्पा वरती पुढे आणखी काय पहायला मिळेल? या विचाराने सिनेप्रेमी उत्साही झाले आहेत. 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी एका मोठ्या घोषणेसाठी लोकांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर, निर्मात्यांनी ‘पुष्पा 2: द रुल’च्या (Pushpa 2: The Rule) धमाकेदार पोस्टरचे अनावरण केले आहे.

या पोस्टरने पुष्पा “फ्लावर नहीं फायर है” हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पोस्टरमध्ये आयकॉन स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) उर्फ पुष्पराज उठून दिसत आहे. हे अनोखे, पोस्टर खरोखरच सर्वात हटके बनले आहे.

दरम्यान, वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘पुष्पा 2: द रुल’च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. देशभरात या सिनेमाबाबत होत असलेली चर्चा पाहता, हा चित्रपट देशात इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

नक्की वाचा: दिग्दर्शक हंसल मेहता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली “फराज” हा चित्रपट तुम्ही का पहावा याची खास कारण….

अशातच, ‘पुष्पा 2: द रुल’चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून, मिथ्री मूव्ही मेकर्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच, या सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल हे प्रमुख भूमिकेत आहेत.

Spread the love

Related posts

आदर्श सून साकारत मिळवली लोकप्रियता, अभिनयसोबतच राजकारणात देखील तयार केली ओळख जाणून घ्या स्मृती ईराणी यांचा प्रवास

सईच्या घरी आली नवी पाहुणी! नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

डंकी सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ गाणे प्रदर्शित, सोनू निगमच्या आवाजातून जाणवते देशाबद्दलची तडफड

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More