‘ऑल इज वेल’ चित्रपटात सयाजी शिंदेचा भाईगिरीतही मराठी बाणा – प्रेक्षकांना हसवणार भन्नाट अंदाज

मराठी भाषा म्हणजे केवळ संवादाचं माध्यम नाही, ती एक भावना आहे — आणि हीच भावना मोठ्या ताकदीने मोठ्या पडद्यावर उतरवली आहे अभिनेते सयाजी शिंदे यांनी. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या आगामी चित्रपट ‘ऑल इज वेल’ मध्ये सयाजी शिंदे एका हटके मराठमोळ्या भाईच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘आप्पा’ नावाचा हा भाई शुद्ध मराठीत बोलतो, पण त्याच्या शब्दांत धमकही आहे आणि हास्याची चिमटाही.

२७ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केलं असून कथा-पटकथा आणि संवाद प्रियदर्शन जाधव यांचे आहेत. निर्मितीची धुरा अमोद मुचंडीकर आणि वाणी हालप्पनवर यांनी सांभाळली आहे. मल्लेश सोमनाथ मरुचे आणि विनायक पट्टणशेट्टी सहनिर्माते म्हणून सहभागी आहेत.

आपल्या या आगळ्या भूमिकेविषयी सयाजी शिंदे म्हणतात, “आप्पा ही भाईगिरी करणाऱ्या डॉनची व्यक्तिरेखा आहे, पण ही सtereotypical वाटणारी व्यक्तिरेखा मराठी भाषेच्या मजेशीर वापरामुळे खास झाली आहे. लेखक-दिग्दर्शकांनी इतक्या चपखलपणे शुद्ध मराठी भाषेचा उपयोग केलाय की ही व्यक्तिरेखा आता माझ्याही मनात घर करून बसली आहे.”

चित्रपटाची गोष्ट ‘अमर, अकबर आणि अँथनी’ या तीन मित्रांच्या जिवलग मैत्रीवर आधारित आहे, ज्यात भरपूर धमाल, गंमत आणि खळखळून हसवणारे प्रसंग पाहायला मिळणार आहेत. या तिघांची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.

चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी आणि दिशा काटकर यांसारखे अनेक कलाकार झळकणार आहेत.

सिनेमाचं संगीत चिनार-महेश आणि अर्जुन जन्या यांचं असून, गीतलेखन मंदार चोळकर यांचं आहे. रोहित राऊत आणि अपेक्षा दांडेकर यांनी गाणी गायली आहेत. नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे, साहस दृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. छायाचित्रण मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचं आहे. कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत.

चित्रपटाचं संपूर्ण टीमवर्क, संवादातली मराठमोळी धमाल, आणि सयाजी शिंदेंसारख्या अनुभवी अभिनेत्याचा ठसका यामुळे ‘ऑल इज वेल’ प्रेक्षकांना हसवणार, भिडवणार आणि एक नवा अनुभव देणार, यात शंका नाही.

Spread the love

Related posts

मनवा-श्लोकच्या नात्याची झलक, प्रेक्षकांना भुरळ घालणारा टीझर प्रदर्शित!

‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित – प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं मुंबईचं गाणं

मल्टीस्टारर ‘थप्पा’ – वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू आणि दमदार स्टारकास्टसह बिग बजेट मराठी सिनेमा

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More