१ हजार कोटींच्या गल्ल्यानंतर अक्षय खन्नाने वाढवली फी? Drishyam 3 साठी मागितले २१ कोटी, निर्माते म्हणाले – ‘त्याच्याकडे काम नव्हतं…’

Drishyam 2 च्या ब्लॉकबस्टर यशानंतर अभिनेता अक्षय खन्ना याने आपली फी थेट २१ कोटी रुपयांपर्यंत वाढवल्याची चर्चा रंगू लागली आहे. Drishyam 3 संदर्भात निर्माते कुमार मंगत पाठक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या २२ दिवसांत तब्बल ६५० कोटींचं कलेक्शन केलं असून, वर्ल्डवाईड गल्ला १००० कोटींच्या पुढे गेला आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक झालंच, पण विशेषतः खलनायकाच्या भूमिकेतील अक्षय खन्नाच्या अभिनयाची प्रचंड चर्चा झाली. दरम्यान, Drishyam 3 बाबत मोठी अपडेट समोर आली असून, अक्षय खन्नाने ही ऑफर नाकारल्याचं सांगितलं जात आहे.

एकीकडे अक्षयने फी वाढवल्याने दृश्यमचे निर्माते नाराज असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे विग वापरण्याच्या वादामुळे अक्षयने चित्रपट सोडल्याचीही चर्चा आहे.

अक्षय खन्नाने मागितले २१ कोटी?

रिपोर्टनुसार, Drishyam 3 साठी अक्षय खन्नाने २१ कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेनंतर सोशल मीडियावर अनेक नेटकरी अक्षयच्या बाजूने उभे राहिले असून, “तो २५ कोटींचा हकदार आहे” असंही काही जण म्हणत आहेत.

 विगच्या अटीवरून अक्षयचा Drishyam 3 मधून एक्झिट?

मिळालेल्या माहितीनुसार, निर्माता कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्नासोबत आधीच कॉन्ट्रॅक्ट साइन केला होता. अक्षयने यासाठी ॲडव्हान्स घेतला होता आणि स्क्रिप्टचं कौतुकही केलं होतं. मात्र, Drishyam 2 मधील भूमिकेसाठी केसांना विग लावण्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यातूनच अक्षयने चित्रपटातून माघार घेतल्याचं सांगितलं जात आहे.

निर्मात्यांच्या मते, यामुळे चित्रपटाची कंटिन्युइटी तुटली, कारण Drishyam 3 ची कथा अक्षयच्या पात्रापासूनच सुरू होते.

निर्मात्यांचा आरोप – ‘हिटनंतर अहंकार वाढला’

कुमार मंगत पाठक यांनी फी वाढवण्याच्या अफवा फेटाळून लावत, “धुरंधरसारख्या हिटनंतर अक्षयचा अहंकार कारणीभूत ठरला” असा आरोप केला. ते पुढे म्हणाले की, “Drishyam आधी अनेक वर्ष अक्षयकडे काम नव्हतं.”

दरम्यान, अक्षय खन्नाची जागा जयदीप अहलावत घेणार असल्याची चर्चा असून, जानेवारी २०२६ पासून शूटिंग सुरू होणार आहे. अजय देवगन आणि इतर कलाकारांसोबत चित्रीकरण होणार आहे. याचबरोबर, निर्माते कायदेशीर कारवाईचा विचार करत असल्याचंही सांगितलं जात आहे.

अक्षयवर होणार कायदेशीर कारवाई?

एका वेबसाईटशी बोलताना कुमार मंगत पाठक यांनी स्पष्ट केलं की, दोन्ही पक्षांमध्ये फी निश्चित झाली होती. मात्र, नंतर अक्षयने विग वापरण्याची अट ठेवली. दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी त्याला समजावून सांगितलं की, Drishyam 2 मध्ये अक्षय विगविना दिसला होता, त्यामुळे तिसऱ्या भागातही तशीच कंटिन्युइटी हवी आहे.

सुरुवातीला अक्षय तयार झाला होता. मात्र, नंतर काही लोकांनी “विगमध्ये तो अधिक चांगला दिसेल” असं सांगितल्यावर अक्षयने पुन्हा विगची मागणी केली. अखेरीस, त्याने चित्रपटासाठी काम करणार नसल्याचं स्पष्ट केल्याचं निर्मात्यांनी सांगितलं.

Spread the love

Related posts

Aanand L Rai on Dhanush in ‘Tere Ishk Mein’: “Some Emotions From Our Last Film Never Left Us”

Baaghi 4 FIRST Song ‘Guzaara’ Out! Tiger Shroff & Harnaaz Sandhu Bring Love And Heartbreak To Life

Sholay 50 years : Dharmendra’s Salary Will Leave You Speechless – Here’s What Every Star Earned

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More