Maidan OTT Release: आता घरबसल्या मोफत पाहा अजय देवगणचा जबरदस्त चित्रपट, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकाल

अजय देवगणच्या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘मैदान’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसली तरी त्याचे खूप कौतुक झाले. हा चित्रपट ५५ दिवस चित्रपटगृहात राहिला आणि या सिनेमाने तब्बल ५३.५० कोटी रुपयांचा नेट कलेक्शन केले. आता हा सिनेमा ज्यांचा पहायचा राहून गेला होता त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ती आनंदाची बातमी अशी कीआता हा चित्रपट ओटीटीवर आला आहे. इतकंच नाही तर हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे ही भरावे लागणार नाहीत. अमित शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ हा चित्रपट देशातील फुटबॉलचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सय्यद अब्दुल रहीम यांचा बायोपिक आहे. (Maidaan Movie OTT Release ajay devgan)

ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच १० एप्रिल ला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट बुधवार म्हणजेच 5 जून 2024 पासून ओटीटीवर स्ट्रीम झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडिओने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘मैदान’च्या प्रीमिअरची घोषणा केली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, ‘फुटबॉलमधील भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची अभूतपूर्व कहाणी. आता बुधवार, ५ जूनपासून घरबसल्या ओटीटीवर ‘मैदान’ पाहता येणार आहे. आणि यासाठी तुमच्याकडे फक्त अॅमेझॉन प्राईमचे सब्सक्रिप्शन असणं गरजेचं आहे. 

‘मैदान’  सिनेमात अजय देवगण शिवाय प्रियामणी देखील आहे. या चित्रपटात तिने रहीमच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. अजय आणि प्रियामणी व्यतिरिक्त गजराज राव आणि रुद्रनील घोष देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत पहायला मिळाले आहेत. या बायोपिकची निर्मिती बोनी कपूर यांनी झी स्टुडिओच्या सहकार्याने केली आहे. त्याच बरोबर या चित्रपटाला ऑस्कर विजेते ए. आर. रहमान यांनी संगीत दिले आहे.

हे देखील वाचा

Maidaan Movie Review: रोमांचक किक!

Spread the love

Related posts

The Roshans: Netflix Docu-Series Explores a Bollywood Legacy

उत्तम शॉट आणि ५०० रुपयांचे बक्षीस, संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ च्या सेटवर अशा प्रकारे काम चालायचे

Lampan: प्रकाश नारायण संत यांच्या कादंबरीवर सीरिज; ‘लंपन’ची गोष्ट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More