लाडके भावोजी पुन्हा येणार! आदेश बांदेकर स्टार प्रवाहवर नव्या शोसह सज्ज, प्रोमोने वाढवलं प्रेक्षकांचं कुतूहल

Aadesh Bandekar New Show On Star Pravah : महाराष्ट्रातल्या तमाम वहिनींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘लाडके भावोजी’ आदेश बांदेकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. झी मराठीवरील सुपरहिट शो ‘होम मिनिस्टर’मुळे घरोघरी पोहोचलेले आदेश बांदेकर तब्बल 20 वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले. या शोमधून फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील महिलांचा सन्मान झाला, आणि पैठणीसाठीचा खेळ घराघरात लोकप्रिय ठरला.

‘होम मिनिस्टर’ने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यानंतर आदेश बांदेकर स्क्रीनवरून दूर राहिले होते. ते कोणत्याही शोमध्ये किंवा मालिकेत दिसले नव्हते. पण आता, त्यांच्या पुनरागमनाची बातमी चाहत्यांसाठी खूपच आनंददायक ठरणार आहे.

स्टार प्रवाह या वाहिनीवरून एका नव्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा झाली आहे. विशेष म्हणजे, या प्रोमोमध्ये आदेश बांदेकर प्रत्यक्ष दिसत नसले तरी त्यांचा आवाज मात्र ठळकपणे ऐकायला मिळतो. “स्टार प्रवाह घेऊन येत आहे खास पंढरीची वारी तुमच्या घरी… पाहा ‘माऊली महाराष्ट्राची’, २३ जूनपासून संध्याकाळी सहा वाजता, फक्त स्टार प्रवाहवर…” असा व्हॉईसओव्हर ऐकू येतो, जो स्पष्टपणे आदेश बांदेकरांचा आहे.

ही खास घोषणा आषाढी एकादशीच्या निमित्ताने करण्यात आली असून, ‘माऊली महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम २३ जूनपासून दररोज संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या शोमध्ये आदेश बांदेकर नक्की काय भूमिका बजावणार, ते सूत्रसंचालक असणार की काही वेगळी जबाबदारी त्यांच्याकडे असणार? याबाबत अधिक माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, भावोजींच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आता केवळ काही दिवसांचीच आहे. ‘माऊली महाराष्ट्राची’ या शोमधून स्टार प्रवाह काय वेगळं घेऊन येणार, हे पाहणं रंजक ठरेल.

Spread the love

Related posts

Smriti Irani : स्मृती इराणी पुन्हा ‘तुलसी’च्या रुपात! ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ मधून लूक लीक

विद्या बालनचं मराठी मालिकेत आगमन; शिक्षिकेच्या भूमिकेत झळकणार, प्रोमो झाला व्हायरल!

‘कमळी’चा प्रेरणादायी उपक्रम! शाळकरी मुलींच्या शिक्षणासाठी १०० सायकलींचं वाटप

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More