चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची प्रत्येक स्टारची इच्छा असते. नुकतीच भन्साळी यांची पहिली वेब सीरिज ‘हीरामंडी’ ओटीटीवर प्रदर्शित झाली. आणि ‘हीरामंडी’ पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांना ही कथा खूप आवडली आहे. तर काही लोक असे ही आहेत जे या कथेवर आणि स्टार्सच्या अभिनयावर विशेष खूश नाहीत. ‘हीरामंडी’साठी भन्साळीयांनी अनेक सुंदर अभिनेत्रींना कास्ट केले आहे. या सिरिजमध्ये काही अभिनेत्रींनी तर छोट्या भूमिकांमध्येही आपली जादू पसरवली आहे. {Sanjay Leela Bhansali, Herramandi)
अशीच एक छोटीशी पण दमदार भूमिका या मालिकेत जयती भाटियाचीही आहे. ‘हीरामंडी’मध्ये त्यांनी फट्टोची भूमिका साकारली होती. नुकतेच ‘ससुराल सिमर का’ फेम जयति भाटिया यांनी भन्साळी यांच्या कामावर भाष्य केले. सेटवर भन्साळी सर्वांना आपुलकीने भेटतात. त्या अशा ही म्हणाल्या की, लोकांनी असे गृहीत धरले आहे की संजय लीला भन्साळी नेहमीच रागीट व्यक्ती म्हणुन वावरतात , परंतु तसे अजिबात नाही.’
संजय लीला भन्साळी यांची काम करण्याची शैली आणि त्यांच्या स्वभावाबद्दल अभिनेत्री म्हणाली की, मला सर्व कलाकार आवडतात. सकाळी जेव्हा अभिनेत्री संजय यांना भेटायची तेव्हा तो ते मिठी मारायचे आणि गालावर किस करायचे.
एबीपी लाइव्हला दिलेल्या मुलाखतीत जयति पुढे म्हणाली की, जेव्हा जेव्हा एखाद्या स्टारने शूटिंगदरम्यान सर्वोत्कृष्ट शॉट दिला जायचा तेव्हा भन्साळी त्या कलाकराला बक्षीस म्हणून 500 रुपये द्यायचे आणि जयति ला हा सन्मान तीन वेळा मिळाला. असून जयतीला संजय लीला भन्साळी यांच्याकडून हीरामंडीच्या सेट वर १५०० रुपये मिळाले आहेत .
‘हीरामंडी’मध्ये उस्तादजींची भूमिका साकारणारा अभिनेता इंद्रेश मलिक यानेही याआधी हा खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, जेव्हा सोनाक्षीची व्यक्तिरेखा फरीदानच्या ‘नथीच्या’ सीनचे चित्रीकरण सुरू होते, तेव्हा भन्साळींना त्याचे काम इतके आवडले होते की त्यांनी इंद्रेश मलिक याला ही 500 रुपयांचे बक्षीस दिले होते. ज्यावर दिग्दर्शक म्हणाला होता, “देखो रोता हुआ जा रहा है, इताना अच्छा तो किया है. “
हीरामंडीबद्दल बोलायचे झाले तर जर तुम्ही संजय लीला भन्साळी यांचे फॅन असाल, तर त्यांचे काल्पनिक आणि मायावी जग तुम्हाला आकर्षित करते. ‘हीरामंडी : द डायमंड बझार’मध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मीन सहगल, शेखर सुमन, फरदीन खान, अध्ययन सुमन आणि फरीदा जलाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हे देखील वाचा :