“पुढच्या ट्रीपची तारीख ठरली…” दिवाळीचा आनंद द्विगुणित करायला ‘या’ दिवशी येतोय ‘झिम्मा २’

२०२१ साली आलेल्या हेमंत ढोमेच्या ‘झिम्मा’ सिनेमाने अमाप लोकप्रियता मिळवत, कमाईचे विविध रेकॉर्ड रचले. सिनेमाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर सिनेमाच्या टीमने दुसऱ्या भागाची घोषणा केली आणि प्रेक्षकांमध्ये एकच उत्साह निर्माण झाला. सिनेमाच्या पहिल्या भागात लंडनच्या ट्रिपदरम्यान, विविध वयोगटातील सात जणींना आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन आणि नवीन शिकवण मिळाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.

आता झिम्मा सिनेमाच्या दुसऱ्या भागात काय नवीन पाहायला मिळणार याबद्दल कमालीचे कुतुहूल सर्वांमध्ये आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी आलेल्या सिनेमाच्या टीझरमध्ये या सिनेमात एक नवीन अभिनेत्री ‘सुने’च्या भूमिकेत पाहायला मिळणार हे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र सिनेमा कधी प्रदर्शित होणार?, नवीन कलाकार कोण असणार?, नवीन ट्रिप कुठे जाणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर गुलदस्त्यात आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

अशातच आता ‘झिम्मा २’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. सिनेमाचे निर्माते असणाऱ्या जिओ स्टुडिओज आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्स, चलचित्र मंडळी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत 24 नोव्हेंबर 2023 रोजी चित्रपट प्रदर्शित होत असल्याची अधिकृत घोषणा केली.

या पोस्टमध्ये निर्मात्यांनी “पुढच्या ट्रीपची तारीख ठरली… आनंदाची गाडी सुटली! २४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात” असे म्हटले आहे. कलर येलो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटात सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, निर्मिती सावंत अशा तगड्या कलाकारांची फौज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. सोबतच काही नवीन कलाकार देखील यात सामील होणार आहे. मात्र त्यांची अजून नावं समोर आलेली नाही. आता दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी झिम्मा २ चित्रपटगृहात जाऊन नक्कीच पाहावा लागेल.

Spread the love

Related posts

आदर्श सून साकारत मिळवली लोकप्रियता, अभिनयसोबतच राजकारणात देखील तयार केली ओळख जाणून घ्या स्मृती ईराणी यांचा प्रवास

सईच्या घरी आली नवी पाहुणी! नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

डंकी सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ गाणे प्रदर्शित, सोनू निगमच्या आवाजातून जाणवते देशाबद्दलची तडफड

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More