बॉलिवूडमधील अतिशय हुशार आणि अभ्यासू दिग्दर्शक म्हणून आनंद एल राय हे ओळखले जातात. आपल्या पठडीबाहेरील चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आणि यश देखील संपादन केले. त्यांना त्यांच्या या उत्कृष्ट चित्रपटांबद्दल राष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. अशा या आनंद एल राय यांनी नुकतीच त्यांच्या आगामी नवीन हिंदी सिनेमाची घोषणा केली आहे.
आपल्या चित्रपटांमधून अनेक नवख्या कलाकारांना संधी देणाऱ्या आनंद यांनी त्यांच्या ‘नखरेवाली’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अंश दुग्गल हा नवोदित चेहरा हिंदी सिनेमांमध्ये पदार्पण करणार असून याबद्दल अधिकृत माहिती देखील दिली गेली आहे.
जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय यांचे कलर यलो प्रॉडक्शन्स यांच्या “नखरेवाली” या नवीन सिनेमाचे दिग्दर्शन राहुल शांकल्या करणार असून, निर्मिती ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा करणार आहेत. सिनेमाच्या चित्रीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. हा चित्रपट एक संपूर्ण मनोरंजनाची साधन असणार असून, ज्यात भावनांची एक उत्तम भरभराट दिसून येणार आहे. या चित्रपटाच्या थीमची एक झलक एका व्हिडिओ मधून प्रेक्षकांन समोर दाखवण्यात देखील आली आहे.
दरम्यान अभिनेता अंश दुग्गल याने त्याच्या या पहिल्या वाहिल्या चित्रपटाविषयी आनंद आणि उत्सुकता व्यक्त करताना सांगितले की, “आनंद सर आणि आमचे दिग्दर्शक राहुल यांच्यासोबत माझ्या अभिनयात पदार्पण होत असल्यामुळे मी खूप उत्सुक आहे. माझे खरोखर एक स्वप्न पूर्ण झाले असून, मी खूप आनंदी आहे. या अविश्वसनीय प्रवासाची मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे. आता माझ्या आयुष्यातील एका रोमांचक अशा नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे. “
तत्पूर्वी ‘नखरेवाली’ या सिनेमात मनोरंजनासोबतच विविध भावनांचे उत्स्फूर्त दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. कलर यलो प्रॉडक्शन ने भारतीय चित्रपटसृष्टीवर कायमच प्रभाव पाडला आहे. “शुभ मंगल सावधान,” “तनु वेड्स मनु,” आणि “रांझणा” सारख्या आयकॉनिक चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर आता ते “नखरेवाली”च्या निमित्ताने त्यांची ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी सज्ज होत आहे.